Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई : आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत कपात

मुंबई : आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत कपात


मुंबई: केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनांनी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 12,000 रुपयाचा लाभ घेणाऱ्या राज्यातील सात लाख 74 हजार 148 महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढे केवळ दरमहा पाचशे रुपये वितरित केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील ३ जुलै च्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही त्यात शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख 74 हजार महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

राज्यातील महिलांना सध्या लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी पडताळणी करण्यात येत आहे . यांनी त्या योजनेचा लाभ घेत असलेल्या सात लाख 74 हजार महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 12,000 रुपये घेत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता केवळ उर्वरित फरकाचे पाचशे रुपये दिले जाणार आहेत याचाच अर्थ नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पंधराशे रुपये ऐवजी पाचशे रुपये देण्यात येणार आहे यावरून विरोधकांनी सरकारवर लक्ष केली आहे.

एकाही पात्र भगिनीस वगळलेले नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी भीम योजनेतून एकाही पात्र भगिनीस वगळण्यात आलेले नाही 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनेचा पंधराशे रुपये पेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे या योजनेत 3 जुलै 2024 नंतर कोणतेही बदल करण्यात आलेला नाही याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे तरीही लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप्रचार केला जात आहे अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे  यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments