नाईचाकूरच्या नागरिकाचे ४० वर्ष तहान भागणारे श्री बाबुराव पवार यांचे दानशूर व्यक्तिमत्व, नाईचाकूरसह परिसरातील नागरिकांना मोफत पाण्याची सेवा
नाईचाकूर प्रतिनिधी: उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील प्रगतशील शेतकरी बाबुराव पांडुरंग पवार हे मागील ४० वर्षापासून उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूत नाईचाकूर नागरिकांची विना मोबदला तहान भागवतात. बाबुराव पवार यांची शेती नारंगवाडी कासार शिरशी रोडवर आहे रोड लगत त्यांची विहीर आहे त्यांच्या विहिरीवर दररोज हजारो घागरी पाणी नागरी घेऊन जातात त्यांच्या शेती पासून नाईचाकुर हे गाव एक किलोमीटर आहे सायकल पायी मोटरसायकल ऑटो इतर वाहनाने नागरिक पिण्यासाठी पाणी बाबूराव पांडुरंग पवार यांच्या शेतातून घेऊन जातात .
उन्हाळ्यात पारा 40 च्या पुढे गेला असता आपल्या पिकाला पाणी देत नागरिकांच्या पाण्याची तहान भागवतात त्यांनी विहिरीच्या जवळ दोन नळ काढले आहेत लाईट असो किंवा नसो विहिरी पासून त्यांचे शेत अर्धा किलोमीटर आहे त्यांनी पाईपलाईनला वाल टाकून त्या नळाला 24 तास पाणी चालू असते नाईचाकूर- नारंगवाडी रोडवर वाहनाची वर्दळ असते वाहने उभारून नागरिक पाणी पितात व जाताना आपल्या वाहनातील कॅन्ड भरून घेऊन जातात बसवकल्याण - तुळजापूर रोडवर नाईचाकूर गाव आहे. या रोडवर तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते भाविक भक्त बाबुराव पांडुरंग पवार यांच्या मळ्यात पाणी पिऊन विसावा घेऊन जेवण करून पुढील प्रवास करतात एक वेळेस पिकाला पाणी नाही दिलं तरी चालेल पण नागरिकांची तहान भागिली पाहिजे बाबुराव पवार हे आपल्या मुले नातवंडांना सांगतात.
आज ते 40 वर्ष झाले नागरिकांची तहान भागतात कधीच कोणाला पाणी घेऊन जाऊ नका किंवा नळावर वाहने धुऊ नका ते नागरिकांना कधीच पाण्यासाठी अडवत नाहीत ; त्याच्यामुळे आज उन्हाच्या कडाक यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत पण बाबुराव पांडुरंग पवार यांच्या विहिरीला पाणी भरपूर आहे त्यांना विचारला असता हा जनतेचा आशीर्वादामुळे आमच्या विहिरीला भरपूर पाणी आहे असे म्हणतात एक लिटरची पाण्याची बाटली आज मार्केटमध्ये वीस रुपयाला आहे बाबुराव पांडुरंग पवार यांच्या दररोज शेतातून दहा ते पंधरा हजार लिटर पाणी मोफत घेऊन जातात नाई चाकूर परिसरात बाबुराव पांडुरंग पवार याना आता पाणीवाले दादा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
परिसरातील नागरिकांना त्यांच्या शेतातील पाणी गोड आहे त्या शेतातील पाणी पिल्यानंतर तहान भागते अशी नागरिक सांगतात गावातील लग्नकार्य किंवा इतर कार्याला टँकर भरून पवार यांच्या शेतातील पाणी घेऊन जातात कधीच कोणाला मोबदला मागितला नाही शेतकरी एक एक थेंब साठवून आपल्या पिकाला पाणी देत आहे पण बाबुराव पवार तहानलेल्या मुक्या प्राण्यांना बोलक्या प्राण्यांना पाणी पाजवत आहेत असे नाईचाकूरचे दानशूर बाबुराव पांडुरंग पवार त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
0 Comments