Hot Posts

6/recent/ticker-posts

विहिरीचा कठडा कोसळून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलाचा मृत्यू ,दक्षिण सोलापुर तालुक्यातील बोरामणी येथील घटना

विहिरीचा कठडा कोसळून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलाचा मृत्यू ,दक्षिण सोलापुर  तालुक्यातील बोरामणी येथील घटना


सोलापुर : दक्षिण सोलापूर(Solapur) तालुक्यातील बोरामणी(Boramani) येथे दि१  रोजी विहिरीचा कठडा  कोसळल्याने पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर ढिगार्‍याखाली अडकलेल्या दोन मुलांना काढण्यासाठी अग्निशामक दल व पोलीस प्रशासन(Police department) युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

या घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी की , बोरामणी येथील 5 तरुण दुपारच्या वेळेस पोहण्यासाठी एका शेतकऱ्याची विहिरीवर गेले होते, विहिरीमध्ये पोहत असताना अचानक विहिरीचा कठडा कोसळल्याने यामध्ये दोन शाळकरी(School Boy) मुलांचा ढिगार्‍याखाली अडकून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. निकीत माने,गौरव राजगुरु (वय१२ ते१५ वर्ष) असे मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. तर तिघांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यश आले असून त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात चालू आहेत. या घटनेची माहिती मिळतात पोलीस प्रशासन व अग्निशमन तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य वेगाने पूर्ण करण्यासाठी यंत्रणा राबवण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा  पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments