Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात कारभारीण मिळणं झालं कठीण-

शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात कारभारीण मिळणं झालं कठीण- हजारो तरुणाचे विवाह रखडले

धाराशिव : फाल्गुन ते वैशाख मराठी महिन्याच्या काळात लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे आधी मुलींच्या लग्नाची चिंता असायची आता मुली नसल्याने मुलांच्या लग्नाची चिंता वाढली आहे. अलीकडच्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे याशिवाय मुलींनीही शिक्षणात आघाडी घेतली आहे त्यामुळे एखाद्या खाजगी कंपनीत नोकरी करणारा व शहरात वास्तव्यास असणाऱ्या मुलांना मुलीकडुन पसंती दर्शविली जात आहे बहुतांशी मुली शेतकरी नवरा नाकारत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात हजारो युवकांचे विवाह रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पूर्वी मुला मुलींचे लग्न आई-वडिलांकडून ठरवण्यात येत होते ;पूर्वी मुलगा व मुलींचे विचारही विचारात घेत नव्हते मात्र आता परिस्थिती बदलली आहेत. बहुतेक मुले व मुली स्वतः आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात सध्या मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढली आहे पूर्वी मुलींचे लग्न जुळवण्यास फार मोठी अडचण येत होती; किंबहुना सहजासहजी मुलगी मिळत होती,मात्र आता मुलाला मुलगी मिळेनाशी झाली आहे आता मुलगी पसंती अधिक महत्त्वाची ठरली आहे कालानुरूप मुलीच्या अपेक्षा वाढल्या असून नोकरदाराला मुलीकडून अधिक पसंती देण्यात येत आहे मुलींकडे शासकीय नोकरदारास पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येत आहे त्यानंतर व्यवसाय खाजगी नोकरदारांना पसंती आहेत मोठ्या प्रमाणात शेती असली तरी मुलींची शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देताना नकार घंटाच आहे. शेतकरी मुलाचे लग्न जुळवताना सध्या अनेक अडीअडचीना सामोरे जावे लागत आहे असे ज्येष्ठ मंडळीकडून बोलले जात आहे.

शेतकरी कुटुंबातील तरुणाचे हाल बेहाल आहेत. मुलींच्या आई वडिलांना पुणे मुंबई सारख्या शहरात राहणारा आयटी कंपनीत नोकरी स्वतःचा वन बीएचके ,टू बीएचके फ्लॅट असणारा जावई अपेक्षित आहे पण प्रत्येक तरुणींना असा जोडीदार शक्य नाही मुलींच्या आई-वडिलांकडून गावात एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या तरुणांना डावले जात आहे त्या तरुणाची मानसिकता समजून घेण्याची गरज आजच्या समाजात निर्माण होणे गरजेचे झाली आहे.

मुलीकडील मंडळींना समुपदेशनाची गरज

मुलींच्या आई -वडिलांचे समुपदेशन करण्याची वेळ आली असून याकरिता स्वतंत्र अभीयान सुरुवात होणे महत्त्वाचे आहे.यामध्ये शासकीय यंत्रणा सामाजिक संस्था प्रतिष्ठित नागरिक समाजातील महत्त्वपूर्ण इतर घटकांचा समावेश करून मुलांच्या विवाहकरिता पुढाकार व मुलींचे आई-वडिलांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. तरुण-तरुणीची  वय वाढत चालली असून आपण आपल्या जीवनात एका विशिष्ट टप्प्यावर असताना योग्य वेळी विवाह सारखा महत्वपूर्ण सुख निर्णय घेऊन आयुष्यात आनंदी राहू शकतो. शिक्षण नोकरी सर्व स्थिर असताना झाल्यानंतरच विवाह करावा अशी कल्पना  तरुणांच्या डोक्यात बसल्या असल्यामुळे याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments