Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावीचा आज निकाल, येथे पाहता येणार निकाल -SSC Result

दहावीचा आज निकाल, येथे पाहता येणार निकाल -SSC Result 


पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 13 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर निकाल पाहता येईल तसेच निकालाच्या माहितीची प्रिंटआऊट घेता येणार असल्याचे राज्य मंडळांनी प्रसिद्ध पत्रकात नमूद केली आहे.

राज्यात दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 16 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली यंदाच्या परीक्षेला सर्व नऊ विभागीय मंडळामार्फत 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावी प्रमाणे दहावीची देखील परीक्षा आणि निकाल यंदा लवकरच जाहीर होत आहे दहावीच्या उत्तर पत्रिकेचे पुनर्मल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची छाया अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांना छायांकित प्रत घेतल्यानंतर पुढील पाच दिवसांत ऑनलाइन शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे त्याचप्रमाणे दहावीची लेखी परीक्षेत सर्व विषयांचे प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी( जून जुलै 2025 फेब्रुवारी मार्च 2026 व जून जुलै 2026) श्रेणी गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील जून जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी श्रेणी सुधार व खाजगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 15 मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिली आहे.

या संकेतस्थळावरून पाहता येणार निकाल

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

sscresult.mkcl.org

निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुण पडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे याकरिता 14 ते 28 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments