🚩मौजे इटकळ येथील श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
हभप आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप करून सांगता करण्यात आली
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आनंदात पार पडला.३ मे ते ९ मे या सात दिवसाच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार दि.९ मे रोजी सकाळी दहा वाजता गावात ग्रंथ व माऊलीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली व दुपारी १२ वाजता काल्याचे कीर्तन आणि हभप. आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.महाप्रसाद रामभक्त शंकर वाघमोडे यांच्या वतीने देण्यात आला होता.यावेळी रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments