छञपतीसंभाजीनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला २० वर्षाची सक्त मजुरी
छत्रपती संभाजीनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वीस वर्षांची सक्त मजुरी आणि पन्नास हजार रुपयांचा दंडाची शिक्ष पोस्को चे विशेष न्यायाधीश ए एस वैरागडे यांनी ठोठावली आहे. शेख फैजान शेख साबीर वय 23 असे नराधमाचे नाव आहे. विशेष म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडीतेला शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करावी अशी देखील आदेश नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात साडेपाच वर्षीय पीडीतेच्या वडिलांनी फिर्याद दिली त्यानुसार 18 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पिडीता नेहमीप्रमाणे अरबी भाषा शिकण्यासाठी मज्जिद मध्ये गेली होती; साडेनऊ वाजेच्या सुमारास पीडिताही रडत घरी आली पिडीतेच्या आईने रडण्याची कारण विचारले असता पिडीता घरी येत असताना आरोपी तिला रस्त्यात भेटला त्याने तुझी आई बोलवते म्हणत पिडीति सोबत घेऊन एका शाळेत नेले तेथे त्यांनी बलात्कार केला ; तरी त्याचे आई-वडील आरोपीला जाब विचारासाठी त्याच्या घरी गेली असता लोक जमा झाल्याची पाहून आरोपीने पळ काढला या प्रकरणात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलीस उपाधीक्षक विजयकुमार मराठे यांनी दोषारोपत्र दाखल केले खटल्याच्या सुनावणी वेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोगकता आशिष दळे यांनी 20 साक्षीदार तपासले सुनावणी अंति न्यायालयाने आरोपी शेख फैजान याला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ६ अनवे २० वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावे लागणार आहे.
0 Comments