अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी नातवानेच आजीला संपवले, दोन नातवाने आजीचा गळा दाबून केला खून
जालना: ज्या आजीने नातवांना बालपणी अंगा खांद्यावर खेळवले, त्याच नातवाने अंगावरील दागिन्यांसाठी आजीचा गळा आवळून खून केला. ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात घडली. नाकातील नथनी व कानातील सोन्याच्या फुलासाठी अक्षरशः नाक कान कापून काढले एवढ्या चित्रपटातील घटनेप्रमाणे हा प्रकार जालना जिल्ह्यातील राजुरी जवळील चांदई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे घडला आहे. केशरबाई गंगाधर ढाकणे वय 65 असे खून झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे या प्रकरणात पोलिसांनी केशरबाई यांच्या दोन नातवांना मध्य प्रदेश बॉर्डरवरून 36 तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. प्रदीप उर्फ काकासाहेब भरत ढाकणे व 22 व संदीप गजानन ढाकणे व 26 अशी अटक केलेल्या नातवांची नावे आहेत.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजुर जवळच असलेल्या चांदई एक्को येथे दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गाव शिवारालगत असलेल्या शेतात केशरबाई ढाकणे यांचा मृतदेह आढळून आला; त्यांच्या कानातून व नाकातून रक्त वाहत होते केशरबाई यांचे कान वनाक तुटल्याचे घटनास्थळी दिसून आले. हातातील चांदीच्या पाटल्या व अंगावरील इतर दागिने ही दिसून आले नाहीत त्यामुळे कुणीतरी दागिन्यांसाठी केशरबाई यांचा खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते.
या प्रकरणाची माहिती मिळतात हसनाबाद व राजुर पोलीस घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवला याप्रकरणी मृत केशरबाई यांचा मुलगा राजू गंगाधर ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला;दरम्यान केशरबाई यांचा गळा आवळून खून झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात समोर आले होते हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय अहिरे यांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपासून केला मयत केसरबाई यांच सख्खा नातू प्रदीप ढाकणे व चुलत नातू संदीप ढाकणे हे घटनेच्या वेळी दिसून आले नव्हते. तसेच ते अंत्यसंस्कारालाही हजर नव्हते दोघी फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली संशय बळवल्याने पोलिसांनी तपास चक्र फिरवले हसनाबाद पोलिसाच्या पथकाने संशयित दोघांना मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतली चौकशीत त्यांनी आजीचा खून केल्याची कबूल केली.
सहाय्यक निरीक्षक संजय अहिरे अधिक तपास करत आहेत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय अहिरे व उपनिरीक्षक फकीरचंद फळे कर्मचारी नरहरी खारडे ,सोमीनाथ गाडेकर, दीपक सोनवणे ,नारायण सरवडे ,प्रकाश बोर्डे ,राहुल भागीले सागर बाविस्कर यांनी ही कारवाई केली.
0 Comments