रक्षकच बनला भक्षक : बंदुकीचा धाक दाखवत पोलीस अधिकाऱ्याचा विवाहीतेवर अत्याचार , नग्न फोटो व व्हिडिओ काढून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
बीड/प्रतिनिधी रुपेश डोलारे : पोलिस खात्याला काळिमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याने बीडच्या एका विवाहित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पिडीतिची घराशेजारी राहणाऱ्या रवींद्र शिंदे यांच्याशी ओळख झाली होती मात्र 2007 मध्ये पिडीतिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली त्यानंतर काही कारणामुळे बीडमध्ये राहण्यासाठी आली तथापि 2011 मध्ये सदरील तरुण पीएसआय झाल्यामुळे तो बीड जिल्हा सोडून गेला परंतु त्यानंतरही तो पिडीतीला वारंवार संपर्क करत होता. 2013 मध्ये रात्री बळजबरीने पिडीतेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला. तसेच नग्न फोटो व व्हिडिओ काढून या प्रकाराविषयी कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकेल अशी धमकी दिली तसेच त्यानंतरही वारंवार अत्याचार केले त्यातून पीडित महिला गरोदर राहिली असता आरोपीने बळजबरीने गर्भपात करायला लावल्याचे पिडीतीने फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून 21 जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रवींद्र लिंबाजी शिंदे (राहणार धाराशिव) यांच्याविरुद्ध कलम बीएनएस(BNS) 64 (2) 115 (2) 351 (2) 351 352 शस्त्र अधिनियम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस अधिकारी तपास करीत आहेत.ही घटना केवळ एक महिलेसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी हादरवणारी आहे. पोलीस दलाच्या आतल्या गळतीकडे बोट दाखवणारी आहे. जेव्हा वर्दीतील माणूसच अशा पातळीला जातो, तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात "कोणावर विश्वास ठेवायचा?" हा प्रश्न उद्भवतो.
पीडितेने तक्रारीत काय म्हंटले आहे
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची ओळख विवाहितेशी २०१३ मध्ये झाली, जेव्हा शिंदे बीड पोलीस दलात कार्यरत होता. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनतर शिंदेने पिस्तुलाचा धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार करत स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. बीडमधून शिंदेची धाराशिवला बदली झाली तेव्हा सुद्धा त्याने वारंवार पिस्तुलाच्या धाकावर अत्याचार केला. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने धाराशिव येथे सोबत राहण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
0 Comments