“सराफ व्यवसायिकाला लुटणारे तीन दरोडे खोर जेरबंद, मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .”
धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे : परंडा येथील सराफ व्यवसायिकाच्या लुटीचा पर्दाफाश करून पोलिसांनी तिघांना गजाआड केले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.परंडा येथील सराफ व्यावसायिक दशरथ गोरे हे सात जुलै रोजी सायंकाळी दुकान बंद करून गावी करंजा येथे जात होते दरम्यान परंडा कुर्डूवाडी मार्गावर चोरट्याने गोरे यांची दुचाकी आढळून आडवून किमती दागिने व रोप असा एकूण तीन लाख 97 हजार रुपयांचा आयोजन लुटून नेला होता याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की मा. पोलीस अधीक्षक श्री. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/1003 वाघमारे, पोह/530 निंबाळकर, पोह/1431 गादेकर, पोह/397 राठोड, पोह576 पठाण, पोह/289 काझी, पोह/929औताडे, पोना/1631 ढगारे,चालक पोह/ 67 घुगे, पोह/1248 अरब, पोअं/बोईनवाड, पोअं/539 डोंगरे, जलद प्रतिसाद पथकाचे पोउपनि बहुरे, पथक व दंगल निंयत्रण पथकाच्या दोन्ही पथकाचे अमंलदार असे पोलीस ठाणे परंडा गुरंन 188/2025 कलम 309, 3 (5) भा. न्या. सं. मधील संशीयत आरोपी बारलोणी ता. माढा जि. सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्या वरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- संतोष विनायक गुंजाळ, वय 40 वर्षे, रा. बारलोणी ता. माढा जि. सोलापूर असे सागिंतले.
त्यास नमुद गुन्ह्या संदर्भात विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्यांने सदरचा गुन्हा मी व माझे इतर पाच इसमांनी केला असल्याची कबुल केले.त्यावर पथकाने परंडा येथील राजु सिध्दु शिंदे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव याचे घरी समता नगर झोपडपट्टी कुर्डवाडी रोड येथील घरी गेले असता सदर ठिकाणी एक इसम मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव राजु सिध्दु शिंदे, वय 40 वर्षे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव असे सागिंतले. त्यास नमुद गुन्ह्या संदर्भात विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्यांने सदरचा गुन्हा मी व माझे इतर साथीदार यांनी केला असल्याची कबुल केले.
पथकाने दोन पंचा समक्ष आरोपी नामे- संतोष विनायक गुंजाळ, वय 40 वर्षे, रा. बारलोणी ता. माढा जि. सोलापूर, सर्जेराव सखाराम डिकोळे, वय 46 वर्षे, रा. लव्हळ ता. माढा जि. सोलापूर, राजु सिध्दू शिंदे, वय 40 वर्षे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 1 मोटरसायकल व सोन्याचे दागिने, रोख रक्कम 23,500₹ असे एकुण 1,97,670 ₹ किंमतीचे माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस परंडा पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/1003 वाघमारे, पोह/530 निंबाळकर, पोह/1431 गादेकर, पोह/397 राठोड, पोह576 पठाण, पोह/289 काझी, पोह/929औताडे, पोना/1631 ढगारे,चालक पोह/ 67 घुगे, पोह/1248 अरब, पोअं/बोईनवाड, जलद प्रतिसाद पथकाचे पोउपनि बहुरे, पथक व दंगल निंयत्रण पथकाच्या दोन्ही पथकाचे अमंलदार यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments