Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब : वारकरी साहित्य परिषदेच्या बैठकिस उपस्थित राहावे - ह.भ. प चौरे महाराज

कळंब : वारकरी साहित्य परिषदेच्या बैठकिस उपस्थित राहावे - ह.भ. प  चौरे महाराज ..... 


कळंब/प्रतिनिधी रुपेश डोलारे - धाराशिव जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषद अंतर्गत जनाई - मुक्ताई - बहिनाई महिला हरिपाठ मंडळाचा विस्तार करण्यासाठी जिल्हास्तरावर व्यापक स्वरूपाची बैठक आयोजित केली आहे . जिल्ह्यातील सर्व वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष ह भ प श्रीहरी चौरे यांनी केली आहे .

शनिवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी स्वामी समर्थ मंदिर शाहुनगर धाराशिव येथे जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषद अंतर्गत जनाई मुक्ताई बहीनाई हरिपाठ मंडळाची बैठक आयोजित केली आहे . या बैठकीमध्ये जनाई मुक्ताई बहीनाईच्या विचाराची जाणीव जागृती करण्यासाठी व इतर काही महत्त्वपूर्ण विषयावर महत्त्वपूर्ण नियोजन करण्यासाठी व्यापक बैठक आयोजित केली आहे . 

 या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हरिपाठ मंडळाचे अध्यक्ष व सर्व महिला व पुरुष तालुका प्रमुखांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह भ प  श्रीहरी चौरे महाराज यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments