धाराशिव : बँक मॅनेजरच्या २५ लाख रूपये लुटीचा बनाव उघड, २४ तासाच्या आत प्रकरणाचा छडा, बँक मॅनेजर गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धाराशिव/ प्रतिनिधीरूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेतील मॅनेजरने स्वतःच बँकेतील 25 लाख रुपये चोरून लुटीचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक 30.06.2025 रोजी संध्याकाळी 19.00 वा.च्या सुमारास ईटकळ टोल नाक्याच्या पुढे सोलापूर हायवे वरती धाराशिव हद्दीमध्ये लोक मंगल को-ऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखा येथून सोलापूर कडे कॅश घेऊन जात असलेल्या लोक मंगल को-ऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखा चे मॅनेजर कैलास घाटे यांना मारहाण करुन त्यांचे डोळ्यात चंटणी टाकून त्यांचेकडील 25 लाख रुपयांची अज्ञात दोन व्यक्तींनी लूट केल्याबाबत ची घटना घडली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व पथक यांना माहिती मिळताच घटनास्थळाकडे रवाना झाले.
सदरील घटनेमधील जखमी व्यक्ती कैलास घाटे याची सार्वजनिक रुग्णालय नळदुर्ग येथे भेट घेऊन त्याच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळविण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक श्री रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तीन टिम तयार करुन तीनही टीमला गुन्ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन करुन सूचना देण्यात आल्या. सदरील टिमने घटनेतील जखमी कैलास घाटे ची अत्यंत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून सदरील गुन्हा त्यानेच केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने त्या अनुषंगाने त्यास पैशाची काय आवश्यकता होती. याबाबत गोपनीय माहिती काढली असता सदरील युवकांवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदरील युवकास ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती आणि या सवयी पोटी त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती. या सर्व माहितीच्या आधारे तसेच प्राप्त झालेल्या तात्रिंक विश्लेषणाच्या आधारे आज रोजी संशयित जखमी युवकास विचारपूस केली असता. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित युवक जो की नळदुर्ग लोकमंगल बँकेमध्ये स्वतः मॅनेजर या पदावर कार्यरत होता. याने सदरील रॉबरीचा बनाव स्वतः रचला होता. त्याच्या आर्थिक अडचणीमुळे सदरील गुन्ह्यातील 25 लाख रुपये स्वतःच चोरून लपवून ठेवले आणि ते काढून देण्याची देखील तयारी दर्शवली त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी नामे- कैलास मारुती घाटे, वय 35 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर याचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली एकूण 25 लाख रुपये रक्कम रीतसर जप्त करण्यात आली.
सदरील कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर,मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोलीस ठाणे नळदुर्ग, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके,अमोल मोरे, पोलीस ठाणे नळदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हावलदार जावेद काझी, शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, विनोद जानराव, नितीन जाधवर, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर,बळीराम शिंदे, पोलीस नाईक- अशोक ढगारे, बबन जाधवर, चालक पोलीस हावलदार- विजय घुगे, सुभाष चौरे, महेबबु अरब, पोलीस अंमलदार- डोगंरे, भोसले, दहीहांडे यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.
0 Comments