Hot Posts

6/recent/ticker-posts

हुंडाबळी प्रकरणी आरोपीस १० वर्षे कारावासाची शिक्षा उदगीर तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

हुंडाबळी प्रकरणी आरोपीस १० वर्षे कारावासाची शिक्षा उदगीर तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


लातूर : उदगीर तालुक्यातील लोणी येथे मयत नीलम स्वामी हिने होण्यासाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून तीस जून 2018 रोजी सात महिन्याच्या मुलीसहित आत्महत्या केली होती याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. उदगीर तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय बी गमे यांनी शनिवारी आरोपींना 10 वर्षे सश्रम करावा अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय उदगीर न्यायालय उदगीर यांची न्यायालयात झाली सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदारांची साक्षी नोंदवण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एडवोकेट शिवकुमार बिरबलकर यांनी काम पाहिले सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षाला सहकार्य केल्याने तसेच संचितीतील कागदपत्राचे अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकील गिरवलकर यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश वाय.बी.गमे  यांनी वाय बी गमे यांनी शनिवारी आरोपी ब्रह्मानंद स्वामी ,गुरुनाथ स्वामी, शांताबाई स्वामी यांना कलम 304 ब, 498 भारतीय दंड विधान संहिता तसेच कलम 3, 4 हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवून मृताचा नवरा ब्रह्मानंद यास दहा वर्षे सश्रम कारावास व मृताचे सासू-सासरे यांना सात वर्षाचा कारावास अशी शिक्षा दिली. विविध कलमाने 27 हजार रुपये दंड ठोठावला आहे.  घटनेनंतर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोलीस निरीक्षक आर. वाय भद्रे यांनी केला कोर्ट पैरवी अक्रम शेख यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments