महामार्ग रस्त्यावरील कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा आमदार कैलास पाटील यांनी वेधले लक्ष! मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली दखल
धाराशिव दि,११ (प्रतिनिधी -रूपेश डोलारे) : महामार्ग व रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात आज महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनीही आमदार पाटील यांच्या प्रश्नाची दखल घेतली. याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री शिवेंद्र राजे यांनी दिले.
यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की, राष्ट्रीय क्रमांक 52 येडशी - संभाजीनगर रस्त्यावर गुत्तेदारानी अंडरपासची व उड्डाणंपुलाची कामे घेतली आहेत मात्र गुत्तेदार काम करत नाहीत त्यामुळे अपघात वाढतात. धाराशिव शहराजवळ एका शाळेजवळ जुना उपळा रोडवर अंडर पास मंजूर होऊन त्याची निविदा झाली आहे. तिथे मध्यंतरीच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून ही कामे वेळेत न झाल्याने हा मृत्यू झाला.
रस्ते सुरक्षा समितीची बैठक २७ जानेवारी २०२५ रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या बैठकीत ज्या सूचना दिल्या त्याबाबत पुढे काहीच झाले नाही, या बैठकीला सहा महिने झाले तरीही याबाबत कोणतीही कारवाई होत नाही याबद्दल आमदार पाटील यांनी सवाल उपस्थित केला.
महामार्गाच्या गतीच्या संदर्भात बोलताना आमदार पाटील म्हणाले की, खामकरवाडी येथे वाहनाचा वेग इतका कमी होती की, चोर चालत्या गाडीत चढतात आणि चोरी करतात. या भागात गाडीचा वेग कमी होत असल्याने लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी वेग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि काही ठिकाणी कमी होती आणि वाहनांची वाटमारी होते याचीही माहिती आमदार पाटील यांनी सभागृहात दिली. या घटनांचे रस्ता सुरक्षा समितीत निर्देश देऊन देखील ६ ते ७ महिने झाले याच अद्याप पर्यंत कुठलही काम केले गेले नाही. कुठला भुयारी मार्ग केला जातोय.. ना सिंदफळ येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले. याशिवाय धाराशिव शहरातील भुयारी मार्ग पूर्ण नाही. येडशी येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण नाही कधीपर्यंत सुरू होतील हे सांगावे असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
यावर मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले की, आमदार पाटील यांनी सांगितलेल्या तिन्ही कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन ज्या ठिकाणी गुत्तेरारानी कामे घेऊन सुरू केली नसतील त्यांना दंडात्मक कार्यवाही करणे किंवा वेळ पडेल तर ब्लॅकलिस्ट देखील करण्यात येईल अस मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
0 Comments