शेतात काम करण्याच्या उद्देशाने बोलवुन एका ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल-
धाराशिव : शेतात काम करण्याच्या उद्देशाने बोलवून घेऊन शेतातील लिंबाच्या झाडाखाली बळजबरीने एका तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिनांक 27 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.याप्रकरणी याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात तरुणावरुद्ध लैंगिक अत्याचार व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत नोंद करण्यात आला आहे . धाराशिव जिल्ह्यामध्ये वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे .
याबाबत पोलिसांकडे मिळालेली अधिक माहिती अशी की, बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 40 वर्षीय महिला दि.27.07.2025 रोजी 18.00 हिस गावातील एका तरुणाने शेतात काम करण्याच्या उद्देशाने बोलावून घेवून शेतातील लिंबाचे झाडाखाली तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.28.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-(BNS) 64, सह अ.जा.ज.प्र.कायदा कलम 3(1)डब्ल्यु (i)(ii) 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments