तुळजापूर तालुक्यातील येवती येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्थेकडून २५० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""
पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम ही महिलांच्या श्रम दाणातून राबवण्यात आली.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्था व गुंज संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर व गुंज संस्था यांच्या वतीने २५० विद्यार्थ्यांना शालेय किट देण्यात आले. या किटमध्ये बॅग ,नोटबुक ,पुस्तक ,कंपास ,बॉटल पेन्सिल बॉक्स ,इंग्लिश व्याकरण ,गाईड अशा प्रकारचे साहित्य देण्यात आले.हे साहित्य पाहून विद्यार्थी खूप खुश झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नवीन ऍक्टिव्हिटीज करण्यास पौर्णिमा संस्थेचा नेहमीच पुढाकार असतो कारण जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्ता दर्जा वाढला पाहिजे ग्रामीण भागातील मुलं शहरी भागातील मुलं जिल्हा परिषद मध्ये जास्तीत जास्त ऍडमिशन होणे हे काळाची गरज आहे असे पौर्णिमा संस्थेच्या सचिव कुमारी बाबई चव्हाण यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आले. तसेच शाळेच्या आवारातले सर्व झाडांना आळे करण्यात आले लोकसभागातून श्रमदान म्हणून शेतीच्या माळावरती सीसीटी म्हणजे पाणी अडवून चर करण्यात आल्या. सीसीटी करणाऱ्या सर्व व्यक्तींना गृह उपयोगी एक एक कीट देण्यात आले यामध्ये ८० महिलांचा सहभाग होता.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माळी सर सर्व शिक्षक स्टॉप शालेय व्यवस्थापक समितीच्या उपाध्यक्ष पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ शारदाताई विठ्ठल शिंदे संस्थेच्या सचिव कुमारी बाबई ताई चव्हाण संस्थेचे व्यवस्थापक नागेश चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक सचिन तांबे सर विशाखा मोगरे वैजयंती गोवे हे सर्वजण उपस्थित होते. पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्थेकडून राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक गाव परिसरातून केले जात आहे.
0 Comments