एसटी महामंडळाचा स्थापत्य अभियंता ९ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Hot Posts

6/recent/ticker-posts

एसटी महामंडळाचा स्थापत्य अभियंता ९ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

एसटी महामंडळाचा स्थापत्य अभियंता ९ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे  : धाराशिव बस स्थानक येथे वाटप करण्यात आलेले वाहन तळ व जागेचा ताबा देण्यासाठी व त्या जागेच्या बाजूला असलेल्या कॅन्टीनचा पार्किंग कडील शटर बंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून नऊ हजाराची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय धाराशिव येथील स्थापत्य अभियंता याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक करण्यात आली आहे. शशिकांत अरुण उबाळे  वय 49 असे लाचखोर स्थापत्य अभियंता यांचे नाव आहे. ही कारवाई धाराशिव बस स्थानकात आज करण्यात आली आहे.

या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,यातील तक्रारदार  याला त्याचे बस स्थानक धाराशिव येथे वाटप करण्यात आलेले वाहन तळ  जागेचा ताबा देणेसाठी व त्या जागेच्या बाजूला असलेल्या कँटीन चा पार्किंग कडील शटर बंद करणेसाठी 15 हजार रु ची मागणी करून 5000/-रु तात्काळ स्वीकारून उर्वरित 10000/-रु ची मागणी करीत असल्याची तक्रार दिनांक 18/07/2025 रोजी दिली आहे. एसीबीच्या पथकाने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 18/07/2025 रोजी विभागीय नियंत्रक कार्यालय रा. प. मं,धाराशिव  येथे पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष वाहन तळ जागेचा ताबा देणेसाठी व त्या जागेच्या बाजूला असलेल्या कँटीन चा पार्किंग कडील शटर बंद करणेसाठी तडजोडी अंती डी सी साहेब यांचे करिता 5000/- रु व स्वतः करीता 4000/-रु असे एकूण 9000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे कबूल केली.

यातील आरोपी लोकसेवक  यांच्याविरुद्ध आज दिनांक  22/07/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईवेळी आलोसे यांनी बस स्थानक आवार, धाराशिव येथे तक्रारदार यांचेकडे  पंचासमक्ष मागणी केलेले 9000 /-रु पंचांसमक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध आंनद नगर पोलीस स्टेशन,  येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या सापळा पथकामध्ये विजय वगरे पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,पोनि विजय वगरे, बाळासाहेब नरवटे, पोलीस अंमलदार तावसकर, हजारे, काझी सर्व ला.प्र.वि. धाराशिव.माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती छत्रपती संभाजीनगर, सुरेश नाईकनवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक तथा  पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती  संभाजीनगर योगेश वेळापुरे,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांचा समावेश होता.

▶️ आरोपीच्या अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू :-* लाच रक्कम 9000/- रुपये व  त्यांचे कडील मोबाईल फोन, इत्यादी वस्तू मिळून आले आहेत. वस्तू व सदरची रक्कम ताब्यात घेण्यात आले आहेत.


▶️ आरोपिताची घरझडती-

आरोपीच्या घरझडतीसाठी त्याचे रहाते घरी पथक तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. 

     

▶️ आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments