धक्कादाय घटना : तुळजापूर मध्ये ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा निर्घृणपणे खून, पोटच्या मुलासारखं सांभाळलं,अन् अंगावरील सोन्यासाठी नियत फिरली, तरुणानी केला घात

Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादाय घटना : तुळजापूर मध्ये ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा निर्घृणपणे खून, पोटच्या मुलासारखं सांभाळलं,अन् अंगावरील सोन्यासाठी नियत फिरली, तरुणानी केला घात

धक्कादाय घटना : तुळजापूर मध्ये ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा निर्घृणपणे खून, पोटच्या मुलासारखं सांभाळलं,अन्  अंगावरील  सोन्यासाठी नियत फिरली, तरुणानी केला घात 


धाराशिव/प्रतिनिधी - : तुळजापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका 65 वर्षे महिलेचा  घराशेजारी राहणारा तरुणाने अंगावरील सोन्याच्या दागिन्यासाठी  हातपाय बांधून गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . माणुसकीला काळीमा  फासणाऱ्या या घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध मयताचा मुलगा संग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरामध्ये संग्राम पाटील आणि त्यांची आई चित्राताई पाटील या एकत्र राहत होत्यातर त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे, त्या नेहमी ते सोने वापरत असत. अशातच शेजारील राहणारा 21 वर्षीय युवक ओम निकम (रा .तुळजापूर )याचा त्या सोन्यावर डोळा होतातो नेहमी घरी येत-जात असायचा. सोबतच त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा पाटील या घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे? तेव्हा त्या ओम निकमसोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर समाज माध्यमांमध्ये चित्राताई पाटील हरवल्याचे सर्वत्र कळविण्यात आले तसेच सर्वत्र नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली मात्र कोठेही ठाव ठिकाणा लागला नाही .त्यानंतर त्यांचा मुलगा संग्राम पाटील यांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली असता पोलिसांनी तपास सुरु केला

या तपासादरम्यान अखेर चित्रा पाटील यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह सोलापूर-लातूर बायपास रोडवर नळदुर्ग रोड ब्रिज जवळ सापडला. त्यांचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ज्या मुलाला पोटच्या मुलासारखं घरात सांभाळलं, खायला प्यायला दिलं त्याच मुलानं ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.मात्र त्यांच्या अंगावर दागिने नव्हते. त्यामुळे हे दागिने ओम निकम यानेच पळवले असल्याचे कबुली ओम निकम पोलिसासमोर दिली आहे.मात्र, चित्रा पाटील यांनी ज्या ओमला स्वतःच्या मुला, लेकरासारखं सांभाळलं, त्याच्या सुख-दुःखात आईसारखी खंबीरपणे आधार दिला त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला. त्याचा गळा दाबून खुन केला व अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले. माणुसकीला काळिमा फसणारे हे कृत्य घडले असून यामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या धक्कादायक  घटनेने तुळजापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 



Post a Comment

0 Comments