Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीटभट्टीवर तात्काळ कारवाई करा अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील करणार ठिया आंदोलन

तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीटभट्टीवर तात्काळ कारवाई करा अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील करणार ठिया आंदोलन


तुळजापूर प्रतिनिधी /रूपेश डोलारे :तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्ट्या चालकांना अभय दिल्या प्रकरणी आज तगायत पर्यंत कोणतीही कारवाही झाली नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 07जुलै रोजी प्रदर्शन महामंडळ लातूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याबाबत सदर निवेदन देण्यात आले आहे .

             या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने अनेक वेळेस पत्रव्यवहार करूनही तुळजापूर तालुक्यातील अवैद्य वीट भट्ट्या विना परवाना घेतल्या असून अवैद्य वीटभट्टीमुळे त्या परिसरातील जमिनींना पीक होत असून सदर वीटभट्टी चालकांनी कायदेशीर परवानगी न घेता खुलेआम वीटभट्ट चालक अवैद्यरित्या व्यवसाय करून शासनाची लाखो रुपयांचा कर व शेतकऱ्याचे शेतीची आर्थिक नुकसान करत आहेत याबाबत अनेक वेळेस आंदोलन आत्मदहन करूनही कोणत्याही प्रकारची कारवाही केली जात नाही . तसेच तुळजापूर तहसीलदार यांनी सदर कारवाही करण्याचा अधिकार माननीय प्रदर्शन महामंडळ लातूर यांच्याकडे असल्याचं लेखी पत्र दिले असून साधारणतः दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन पण कारवाई केली जात नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शन महामंडळ लातूर या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिले आहे सदर निवेदनावर गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .

             या संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार यांच्याकडे असून आमच्या कार्यालयाने अनेक वेळेस संबंधित तहसीलदार यांना पत्रव्यवहार केले आहेत त्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार त्यांचे आहेत .

परमेश्वर कांबळे.प्रदर्शन महामंडळ लातूर

Post a Comment

0 Comments