तुळजापूर तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत उद्या होणार जाहीर
तुळजापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 108 ग्राम पंचायतीचे (Gram Panchayat Elections) सन 2025 ते 2030 या कालावधीतील आरक्षण सोडत माहे एप्रिल मध्ये जाहीर करण्यात आली होते. मात्र ती आरक्षण सोडत शासनाने रद्द केल्यामुळे पुन्हा आता 10 जुलै रोजी दुपारी 4 वाजता आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गातील महिला आरक्षणासाठी सोडत काढण्याची प्रक्रिया होणार आहे .आरक्षण सोडतीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते व इच्छूक उमेदवार, ग्रामस्थांनी पंचायत समिती सभागृहात (Panchayat Samiti) उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या (Election Department) वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायत आरक्षण सोडतीसाठी, जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी धाराशिव यांना नेमले असून, त्यांच्या उपस्थितीत हा सोडत कार्यक्रम पार पडणार आहे.
एप्रिल 2025 रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. त्या आरक्षणाच्या आधारावर भावी सरपंचांनी (Sarpanch) आगामी निवडणुकीची तयारीसह मतदार राजाशी संपर्क करणे सुरू केले होते. परंतु शासनाने (Government) जाहीर केलेले आरक्षण रद्द केल्याने आतापर्यंत, केलेल्या जनसंपर्क आदिवर पाणी फिरले आहे. आता जिल्हा प्रशासनाच्या (Administration) वतीने नवीन आरक्षण जाहीर करण्याची 10 जुलै गुरुवारी ही तारीख ठरविली असुन, . नवीन आरक्षण जाहीर केले जाईल यामुळे भावी सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या भंग झाला आहे. आता सर्वांच्या नजरा जाहीर होणाऱ्या आरक्षणाकडे लागले आहे.
0 Comments