खा. निलेश लंके यांच्या हस्ते लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान
गणपतराव देशमुख यांच्यासोबत काम करायला मिळाले हे भाग्य - खा. लंके
(सोलापुर प्रतिनिधी - कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांना खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा मातृभूमी सोशल फाउंडेशन, झेप फाउंडेशन, कांताभाऊ राठोड आणि अशोक पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यात सामाजिक, शिक्षण आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या विशेष व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे आजीवन सदस्य, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे ११ वेळा सदस्य आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दोन वेळा मंत्री राहिलेले गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन केलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांना याच चित्रपटासाठी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे चे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपायुक्त तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र राहुल आवारे, सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, कामगार अधिकारी साळुंखे, उपविभागीय अभियंता मोहन भदाणे, पोलीस निरीक्षक शरद झिंने यांच्यासह अन्य मान्यवरांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाचे कौतुक केले. लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख कसे होते आणि त्यांच्यासोबत कामाचा अनुभव सांगून गणपतराव देशमुख अर्थातच आबासाहेबांसारख्या सत्कर्मी व्यक्तिमत्त्वावर बायोफिक रूपात चित्रपट तयार करणे हे खरे म्हणजे आजच्या व्यावसायिक युगात मोठ्या धाडसाचे काम आहे. हे धाडसाचे काम लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी केले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेही खासदार लंके म्हणाले.
0 Comments