Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथून दोन मोटरसायकली लंपास, चोरट्यांना जेरबंद करण्याची वाहनधारकास नागरिकांची मागणी

तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथून दोन मोटरसायकली लंपास, चोरट्यांना जेरबंद करण्याची वाहनधारकास नागरिकांची मागणी


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अनदुर येथून मोटरसायकली चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंदुरच्या आठवडी बाजारामध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकासह नागरिक हैराण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील कोकणगाव येथील शरद गोविंद मोरे हे नळदृग येथे वास्तव्यास आहेत त्यांची हिरो फॅशन एक्स प्रो कंपनीची मोटरसायकल(Mh-15FP-5093) व बापूराव महादेव वरदे यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक एम एच -12-QK-2064) या मोटरसायकली चोरट्याने लंपास  केली.गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी एक ते लंपास  या वेळेत चोरट्याने अंदुर येथील जिल्हा परिषद शाळेजवळून या मोटरसायकली चोरून नेल्या याप्रकरणी मोरे यांनी सोमवारी दिनांक 14 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून नळदृग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments