Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी येथे मराठी भाषिक अधिकारी नेमण्याची मागणी

तुळजापुर : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी येथे मराठी भाषिक अधिकारी नेमण्याची मागणी 


धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे :  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये मराठी भाषिक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करावी अशी मागणी शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी दि .१७ जुलै रोजी बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असुन तामलवाडी सह परीसरातील शेतकरी, व्यापारी, पुरुष, महीला बचत गटांची खाती या बँकेत आहेत. परंतु सदरील बँकेत बँक मॅनेजर व इतर कर्मचारी हे हिंदी भाषिक असल्याने व त्यांना मराठी भाषा समजत नसल्याने तसेच त्यांची हिंदी भाषा ही नागरीकांना समजत नसल्यामुळे व ही बँक खेडेगावामध्ये असल्याने बँकेतील ठेवीदारांना, शेतकरी, महीला मजुरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गृहकर्ज, पिक कर्ज, व्यावसायिक कर्ज व इतर कर्ज घेणाऱ्या व कर्जाचा भरणा करणार्या नागरीकांना भाषेमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतकर्यांच्या थकीत पिक कर्जाच्या वसुलीसाठी सदरील बँक मॅनेजर व इतर कर्मचारी सक्तीच्या कर्जवसुली करीता गावोगाव फिरत असल्यामुळे नागरीकांना दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. त्याचप्रमाणे बँक मॅनेजर व इतर कर्मचारी हिंदी भाषिक असल्याने व त्यांना मराठी भाषा समजत नसल्याने बँकेतील अर्थिक व्यवहारात घोळ झाल्याच्या घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

     तामलवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये बँक मॅनेजर व इतर कर्मचारी हे हिंदी भाषेत संभाषण करत असुन त्यांची भाषा नागरीकांना व्यवस्थित समजत नसल्याने व मराठी भाषा बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांना समजत नसल्याने बँकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असुन याचा फटका ठेवीदार, कर्जदार महीला पुरुषांना बसत असुन तामलवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये मराठी भाषा अवगत असलेले अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करुन ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय अधिकारी शाखा सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.




Post a Comment

0 Comments