खरीप 2022 पासूनचा सर्व थकीत पिक विमा उद्या मिळणार, कृषी विभागाकडून परिपत्रकाद्वारे माहिती-
पुणे/प्रतिनिधी रूपेश डोलारे : राज्यातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) ही एक महत्त्वाची संरक्षण योजना आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, कीडरोग अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट होते. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवली जाते. परंतु, मागील काही वर्षांत पीकविमा भरपाई मिळण्यात उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आता ही थकीत भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account Transfer) जमा होणार आहे. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सोमवारी हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात येणार आहे.केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान (Agriculture Minister Shivraj Singh Chauhan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरपाई खरीप २०२२ (Kharif 2022) पासून रब्बी २०२४-२५ (Rabi 2024-25) पर्यंतच्या सर्व प्रलंबित दाव्यांची असणार आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरिप २०२२ पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. तसेच खरिप २०२४ मधील वेगवेगळ्या ट्रीगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे. रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये सन 2022 पासून वेगवेगळे हंगामातील पिक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्रालयाच्या परिपत्रकातून जाहीर करण्यात आले आहे.पीकविमा भरपाई (Crop Insurance Compensation) थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. मागील दोन वर्षांपासून थकीत असलेली रक्कम आता त्यांच्या हातात येणार आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी दूर करून त्यांना आत्मविश्वास देणारा आहे.
0 Comments