तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ चे जनसेवक सुदर्शन (भैय्या) वाघमारे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोफत डेंग्यू मच्छर प्रतिबंधक व तणनाशक फवारणी अभियान सुरू

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील जनसेवक सुदर्शन भैया वाघमारे यांच्या पुढाकारातून मोफत डेंगू मच्छर प्रतिबंधक व तणनाशक फवारणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रभागातील नागरिकांना डेंग्यू तसेच इतर मच्छरजन्य रोगांपासून सुरक्षित ठेवणे हा आहे. फवारणीसाठी विशेष रसायनांचा वापर करून डेंग्यू पसरवणाऱ्या मच्छरांचा नाश करण्यात येत आहे. तसेच तणनाशक फवारणी करून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यास मदत होणार आहे.

हे अभियान कॉंग्रेस उप शहराध्यक्ष, तुळजापूर श्री. किरण यादव यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.या प्रसंगी राजाभाऊ चोपदार, अनमोल साळुंके, नागेश कीवडे, ॲड. शुभम खोले, सागर मस्के, दत्ता बेंद्रे, संकेत मस्के, आदित्य बुरांडे आदी उपस्थित होते.

जनसेवक सुदर्शन (भैय्या) वाघमारे यांनी सांगितले की,"नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छ परिसर ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. हे अभियान सातत्याने राबवून डेंग्यू-मुक्त प्रभाग घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे."

या अभियानाद्वारे प्रभागातील प्रत्येक गल्ली-बोळात फवारणी करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments