अल्पवयीन मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार , तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव/ प्रतिनिधी रूपेश डोलारे : भूम तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी तब्बल नऊ महिन्यानंतर पिडितिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भूम पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट रोजी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की भूम तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने पीडीतेच्या घरात प्रवेश करून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने पीडीतेच्या घरी येऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे,ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती या भीतीमुळे पीडित कुटुंबाने इतके दिवस पोलिसात फिर्याद देऊ शकले नाही अखेर 13 ऑगस्ट रोजी पीडित मुलीच्या हिम्मत दाखवून पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून भूम पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64 (2) एम 351 (3) सह पोस्को(Posco) कायद्याच्या कलम 4 8 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भूम पोलीस करत आहेत.
0 Comments