कळंब तालुक्यात पावसाचा धुमाकूळ' मांजरा नदीला पूर, पुरात एक शेतकरी वाहून गेला; एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल, युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू-Dharashiv-Kalanb Rain News

Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब तालुक्यात पावसाचा धुमाकूळ' मांजरा नदीला पूर, पुरात एक शेतकरी वाहून गेला; एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल, युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू-Dharashiv-Kalanb Rain News

कळंब तालुक्यात पावसाचा धुमाकूळ' मांजरा नदीला पूर, पुरात एक शेतकरी वाहून गेला; एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल, युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू-Dharashiv-Kalanb Rain News


धाराशिव प्रतिनिधी : कळंब तालुक्यातील खोंदला गावाजवळ मांजरा नदीच्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुबराव शंकर लांडगे (वय ६५) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, गेल्या तीन तासांपासून त्यांचा शोध सुरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, सुबराव लांडगे हे पुलावरून चालत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात पडले. वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड आहे.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या साहाय्याने नदीच्या पात्रात आणि काठावर शोध घेतला जात आहे. आता या बचावकार्याला अधिक बळकटी देण्यासाठी NDRF चे पथकही सामील झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना  ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. ते बचावकार्यावर स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत आहेत.मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाने नदीच्या आसपासच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत कार्य सुरू

खोंदला, ता. कळंब या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून या पुरामध्ये एक व्यक्ती अडकली असल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट दिली. ड्रोनद्वारे पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून शोधकार्याला गती देण्यासाठी तात्काळ बोट मागवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.


वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला पूर आलेला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, काही अडचण असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी सर्वांना केले.


जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याबाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना आपण दिलेल्या आहेत.






Post a Comment

0 Comments