जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निर्गुण हत्या, जामिनावर बाहेर आल्यानंतर केले आरोपीने कांड
धाराशिव तालुक्यातील घटना
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: जमिनीच्या वादातून भर चौकात पती-पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव(Dharashiv) तालुक्यातील करजखेडा (पाटोदा) येथे दिनांक 13 रोजी घडली आहे. जमिनीच्या वादातून आरोपी बाप लेकाने एका पती पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपींनी रस्त्याने जाणाऱ्या पती पत्नीला आधी गाडीची धडक दिली. धडक बसल्यावर पती पत्नी खाली पडताच गाडीतून उतरून बाप लेकाने त्यांच्यावर कोयत्याने वार करून संपवले. भर चौकात झालेल्या घटनेने धाराशिवमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
दुहेरी हत्याकांडामध्ये नेमकं घडलं काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार चौकातून जात असताना आरोपींनी तुळजापूर सोलापुर हायवे वरील करजखेडा गावातील भर चौकात दांपत्याच्या गाडीला धडक दिली .धक्क्याने गाडी थांबताच आरोपींनी कोयत्याने पती-पत्नीवर वार करत त्यांचा खून केला . घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले . आरोपी जीवन हरिबा चव्हाण आणि हरिबा यशवंत चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत .आरोपी चव्हाण बापलेक व मृतसहदेव यांचा जमिनीवरून वाद सुरू होता .या वादातून सहदेव यांच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता .गेली अनेक वर्ष सहदेव जेलमध्ये होता .दरम्यान छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो तुरुंगा बाहेर आला होता .जामिनावर बाहेर आल्यानंतर जमिनीच्या वादाचा वचपा म्हणून पवार दांपत्याची निर्घृण हत्या केली .
![]() |
करजखेडा पाटोदा चौकात घटना घडल्यानंतर नागरिकांनी मोठे गर्दी केली होती |
शेतीचा वाद पवार दांपत्याच्या जीवावर घेतला
शेतीचा वाद कधी विकोपाला जाईल हे सांगता येत नाही, अशीच घटना धाराशिव तालुक्यातील पाटोदा येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे यामध्ये पती पत्नी यांचा कोयत्याने सपासप वार करून खून केले आहे, यामध्ये मयत सहदेव पवार यांच्या शरीरावर कोयत्याने दहा ते बारा वार केले आहे तर पत्नी प्रियंका हिच्या नरड्यावर वार करून ती जागीच ठार झाली आहे या घटनेमुळे पाटोदा परिसरात खळबळ उडाली उडाली आहे या या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0 Comments