मौजे गोंधळवाडी येथील रिक्त असलेल्या सरपंचपदी सौ.सविता मोटे यांची निवड.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सरपंच पदासाठी दोन उमेदवार दोघानाही समान मते.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""चिठ्ठीतून लागली मोटे यांना सरपंच पदाची लॉटरी.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे गोंधळवाडी येथील ग्रामपंचायतच्या माजी सरपंच कै. रूक्मीनबाई विश्वनाथ मोटे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मंजूर झाला व काही दिवसांनी त्यांचे निधन झाले, यामध्ये गोंधळवाडी ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त पद होते, यानंतर गोंधळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड प्रक्रिया बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली.यामध्ये गोंधळवाडी ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही सात आहे यामध्ये एक सदस्य यांच्या मृत्यूमुळे सदस्य संख्या सहा झाली त्यामध्ये आज झालेल्या निवडीमध्ये दोन उमेदवार यांचे फॉर्म आले होते. यामध्ये मताचे संख्याबळ दोन्हींचे पण तीन-तीन झाले दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने पर्यायी मार्ग म्हणून दोन्ही उमेदवाराच्या नावे चिठ्ठी लिहून लहान मुलाच्या हाताने एक चिठ्ठी निवडण्यात आली यामध्ये सौ. सविता उमेश मोटे (पाटील) यांची चिट्टीमध्ये निघालेल्या नावावरून सरपंचपदी सौ.सविता मोटे यांची निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले. सरपंच निवडीनंतर सौ. सौ. सविता मोटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments