तुळजापुरात जातिवाचक शिवीगाळ करून पती-पत्नीस बेदम मारहाण चार जणाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापुर/प्रतिनिधी रुपेश डोलारे : जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची उद्देशाने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शहरातील एका पती-पत्नीस गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक 29 रोजी घडली आहे याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दत्ता हनुमंत चौगुले, दशरथ यंकप्पा चौगुले, रमेश दत्ता चौगुले, रेणु दशरथ चौगुले, सर्व रा. घाटशिळ रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.06.2025 रोजी सायंकाळी 21.00 वा. सु.घाटशिळ रोड वेताळ नगर तुळजापूर येथे फिर्यादी नामे- सोनी बब्रु भोसले, वय 28 वर्षे, रा. घाटशिळ रोड वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना फिर्यादीचे पती मनोज धोत्रे हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही लोखंडी रॉडने काठीने व चप्पलने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोनी भोसले यांनी दि.29.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 109, 115(2), 351(2),सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1)(r), (s) 3(2),(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments