चिवरी येथे ग्रामपंचायत ठराव घेतलेल्या रजिस्टरवर सही करण्याच्या कारणावरून दोघा जणांना बेदम मारहाण,सात जणांवर गुन्हा दाखल

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे ग्रामपंचायत ठराव घेतलेल्या रजिस्टरवर सही करण्याच्या कारणावरून दोघा जणांना बेदम मारहाण,सात जणांवर गुन्हा दाखल

चिवरी येथे ग्रामपंचायत ठराव घेतलेल्या रजिस्टरवर सही करण्याच्या कारणावरून  दोघा जणांना बेदम मारहाण,सात जणांवर गुन्हा दाखल 

धाराशिव प्रतिनिधी /रुपेश डोलारे: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामपंचायत ठराव घेतलेल्या रजिस्टरवर सही करण्याच्या वादातून दोघा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चिवरी येतील  सचिन विजय बिराजदार, अनिल विजय बिराजदार, प्रशांत पंडीत बिराजदार, रुपेश चंद्रकांत बिराजदार, ओमप्रकाश  प्रभाकर बिराजदार, जयप्रकाश बिराजदार, अजय महादेव झिंगरे सर्व रा. चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.23.08.2025 रोजी 17.00 वा. सु.बसवेश्वर महाराज चौक चिवरी येथे फिर्यादी नामे-मिलींद मारुती होगाडे, वय 32 वर्षे, रा. चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचा भाउ विठ्ठल होगाडे यांना नमुद आरोपींनी ग्रामपंचायल ठराव घेतलेल्या रजिस्टरवर सह्या का करत नाही या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मिलींद होगाडे यांनी दि.27.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments