पावसाळ्याचे दिवस आहेत गावात स्वच्छता ठेवून कोरडा दिवस पाळा - सिईओ घोष
"""""”"""""""""""""""""""""""
मौजे काक्रंबा येथील सर्वरोग निदान शिबीरात २४७ रुग्णांची तपासणी व उपचार.
""""""""""""""""""""""""""""""""""”"""
इटकळ (दिनेश सलगरे):- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत त्यामुळे गावपातळीवर ग्रा.प.च्या सरपंच ग्रामसेवकांनी जागरूक राहून गावांमध्ये कुठे ही पाण्याचं डबकं साचून न देता वेळीच सार्वजनिक ठिकाणी ची व नालीची साफसफाई व स्वच्छता करून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन काक्रंबा येथे हरिहर गणेश मंडळांच्या वतीने शनिवार दि ३० रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जि.प. सिईओ डाँ.मौनक घोष यांनी केले. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील हरिहर गणेश मंडळांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्ताने शनिवार दि ३० रोजी गावांमध्ये आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उद्घाटन जि.प. सिईओ डॉ.मौनक घोष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रफिक अन्सारी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी ,वैद्यकीय अधिकारी डॉ.उबेद अली सय्यद डाँ.वैष्णवी जगताप,माजी जि. प.सदस्य बालाजी बंडगर ,सरपंच कालिदास खताळ , शिवसेनेचे सोशल मीडिया तुळजापुर तालुका प्रमुख चेतन बंडगर, माजी सरपंच अनिल बंडगर,अच्युत वाघमारे,अशोक देवगुंडे, आदीसह हरिहर गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .यावेळी पुढं बोलताना घोष म्हणाले की सध्या जिल्ह्यात डेंग्यू चे ३२ रूग्ण आढळून आले आहेत त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रा.प.च्या सरपंच ग्रामसेवकांनी गावात सर्वत्र फिरून स्वच्छतेची पहाणी करून तुंबलेल्या गटारी, रस्त्यावर साचलेले पाण्याची डबकी यांची साफसफाई व स्वच्छता करून घ्यावी जेणेकरून डासांची उत्पत्ती होऊन गावात रोगराई पसरणार नाही तसेच सार्वजनिक पाणी पुरवठ्याची स्वच्छता करून टी सी एल पावडरचा वापर करावा व पाणी साठयात पाणी जास्त दिवस साठवून न ठेवता आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले .
दिवसभर झालेल्या सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिरात तब्बल २४७ रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.यासाठी आरोग्य सहाय्यक सतीश कोळगे, उद्धव अडसूळ, सौदागर गायकवाड,मंजुश्री सुरवसे,श्रीमती. रेणूका राठोड , हरीश पटेल ,सारिका पवार व आशा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. घरकुलाची कामं प्रलंबित ठेवू नका लाभार्थीची अडचण नको यावेळी सिईओ मौनक घोष यांनी गावातील मंजूर घरकुलाचा आढावा घेत किती घरकुल मंजूर आहेत किती लोकांना पहिला हप्ता मिळाल आहे तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी बांधकामाची अट न लावता घ्या समोर लाभार्थीनी बांधकामांचे साहित्य आणून ठेवलं असेल तर तातडीने दुसरा हप्ता टाकण्यात येईल जर कुणी अधिकारी कर्मचारी हप्ता काढण्यासाठी लाभार्थीना टोलवाटोलवी करत असेल कारवाई करण्याचा सजड दम त्यांनी दिला.

0 Comments