दुर्दैवी घटना : रुग्णाला उपचारासाठी नेत असताना भरधाव कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू, जालना जिल्ह्यातील घटना -
जालना /प्रतिनिधी रूपेश डोलारे : राजूर -टेंभुर्णी रस्त्यावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ भरधाव (आय ट्वेन्टी) कारने mh20- 83 82 मॉर्निंग वॉक साठी आलेल्या एका नागरिकास जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या 80 फूट खोल विहिरीत कोसळी यात कारमधील पाच जणांचा बुडून जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की राजूर- टेंभुर्णी रस्त्यावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ भरधाव कारने शुक्रवारी दिनांक 29 रोजी पहाटे 5 च्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी चाललेल्या पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट रस्त्यापासून 50 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. या घटनेमध्ये ज्ञानेश्वर लक्ष्मण भांभीरे वय (25) पद्माबाई लक्ष्मण भाबीरे वय (55) दोघे राहणार (कोपर्डा तालुका भोकरदन ) निर्मला सोपान डकले वय (25) ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले वय () दोघे (राहणार गेवराई गुंगी तालुका फुलंब्री) आदिनाथ तुळशीराम भामरे वय (40) राहणार कोपर्डा अशी मृतांची नावे आहेत या अपघातात मॉर्निंग वॉक करीत असलेले भगवानराव साळूबाब बनकर वय राहणार गाडेगव्हाण तालुका भोकरदन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेवराई गुंगी येथील ज्ञानेश्वर टकले हे भोकरदन तालुक्यातील कोपरडा येथून नातेवाईकांना अर्धांगवायची उपचारासाठी सुलतानपूर येथे कारणे घेऊन जात होते राजुर टेंभुर्णी रोडवरील गाडीगव्हाण फाट्याजवळ आल्यानंतर रस्त्यालगत पहाटे फेरफटका मारत असलेल्या भगवान बनकर यांना कारणे धडक दिली ्यानंतर रस्त्यावरील इतर पादचाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट रस्त्याच्या 50 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. पोलीस प्रशासनाने क्रेन जेसीबी व अन्य साहित्याच्या साह्याने तात्काळ मदत कार्य सुरू केले जालना येथून अग्निशमक दलासह रेस्क्यू पथक महसूल यंत्रणा यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र विहिरीत 70 फूट पाणी असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला अखेर सात तासाच्या अथक परिश्रमानंतर अपघातग्रस्त कार व पाचवे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले यावेळी देळेगव्हाण ,गाडेगव्हाण ,राजूर येथील तरुणांनी बचाव पथकास मदत केली टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे. हा भीषण अपघात ज्या विहिरीत घडला ती विहीर टेंभुर्णी- राजूर या मुख्य रस्त्यापासून आत मध्ये जवळपास 50 फूट अंतरावर आहे या विहिरीला कठडे असून विहिरीसह शेतीभोवती तारेचे कुंपण केलेली आहे.हि कार कुंपण व विहिरीचे जमिनीपासून चार फूट उंच असलेले सिमेंट कठडेत तोडून आत कोसळली त्यामुळे या कारमधील पाच जणांना जलसमाधी मिळाली या दुर्घटनेमुळे सर्वत्र होत आहे.

0 Comments