मराठा आरक्षण आंदोलनासाठी सबंध मराठा बांधवांच्या चार चाकी गाड्यांना टोल माफी देणे व आरोग्य यंत्रणा उभी करण्यात यावी : तुळजापूर शहरवासीयाकडुन मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या आरक्षण संदर्भात आंदोलनासाठी सर्व मराठा बांधवांच्या चार चाकी गाड्यांना टोल माफी व आरोग्य यंत्रणा उभी करण्यात यावी यासाठी तुळजापूर तुळजापूर शहरवासीकडून निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

या निवेदनात अशी नमूद केली आहे की मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे  पाटील यांची मराठा समाजाला आरक्षण मिळणे यासाठी मुंबई येथे भव्य आंदोलन होणार आहे.या आंदोलनाकरता संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने दिनांक 27/08/2025 रोजी निघणार आहेत.या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून मुंबईला जाणार रस्त्यावरील टोल नाक्यांवर आंदोलकांच्या फोर व्हीलर वाहनांना टोल माफी करण्यात यावी, जेणेकरून टोल नाक्यावर ट्राफिक जमा होऊन वाहतूक सुरक्षेचा निर्माण होणार नाही..

तसेच आंदोलकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक टोलनाक्यावर योग्य त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी बूथची  व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे गर्दी व प्रचंड वाहतुकीमुळे आजारी पडणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या आंदोलकांना तात्काळ उपचार करणे सोयीचे होईल.तरी वरील दोन्ही मुद्द्यांचा सहानुभूतीने विचार करून टोल माफी व आरोग्य सुविधा निर्माण करण्यात याव्या ही विनंती. या निवेदनावर इंद्रजीत साळुंके,बाळासाहेब भोसले,धैर्यशील दरेकर,प्रशांत इंगळे,किरण कदम,यांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments