सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी केली अवैध धंदेवाल्याकडून हप्ते वसुली, अवैध धंदेवाल्यांना पाठबळ का?सीडीआरसह फोन पे रेकॉर्ड तपासण्याची लहु खंडागळे यांची निवेदनाद्वारे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी केली अवैध धंदेवाल्याकडून हप्ते वसुली, अवैध धंदेवाल्यांना पाठबळ का?सीडीआरसह फोन पे रेकॉर्ड तपासण्याची लहु खंडागळे यांची निवेदनाद्वारे मागणी

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी केली अवैध धंदेवाल्याकडून हप्ते वसुली, अवैध्य धंदेवाल्यांना पाठबळ का?सीडीआरसह फोन पे रेकॉर्ड तपासण्याची लहु खंडागळे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 



धाराशिव दि. २६ (प्रतिनिधी) रूपेश डोलारे - धाराशिव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक  दिनेश उत्तम जाधव यांनी अवैध धंद्याला संरक्षण देऊन स्वरूपात बेकायदेशीर हप्ता वसुली केली आहे. हे गंभीर आरोप लहू राम खंडागळे यांनी एका निवेदनाद्वारे गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहेत. दरम्यान, ही वसुली थेट बँक खात्यात जमा केली असल्यामुळे सीडीआर व फोन पे रेकॉर्डची तपासणी करावी अशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे अवैध धंद्याचा बिमोड करण्याऐवजी अवैध धंदेवाल्यांची तळी उचलण्याचे काम का केले ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे एपीआय जाधव यांनी २०२४-२५ या काळात विविध अवैध धंद्यांना संरक्षण देऊन दरमहा हजारो रुपयांची लाच वसूल केली आहे. एवढेच नव्हे तर ही रक्कम त्यांच्या कॅनरा बँकमध्ये असलेल्या खाते क्रमांक - 1396201006034, IFSC – CNRB0001396 या खात्यात जमा होत असल्याचा अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी

शासकीय पदाचा गैरवापर करून अधिकारी सर्रास पैशांची वसुली करीत असल्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम उचलण्याच्या प्रकारामुळे शहरात अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच  जाधव यांच्याविरुद्ध आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळवण्यासाठी त्यांच्या फोन पे रेकॉर्ड्स व कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासण्यात यावेत. दोष सिद्ध झाल्यास त्यांना पदावरून पायउतार करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे. या आरोपामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती पावले उचलतात ? कोणती कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.अशा प्रकारचे प्रकरण उघडकीस आल्याने खाकी वर्दीच्या शिस्तीला आणि प्रतिष्ठेला तडा जात आहे. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत चालली आहे त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून या प्रकरणाला योग्य न्याय मिळणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांतून  चर्चिले जात आहे.



Post a Comment

0 Comments