महाराजांची भक्ती करण्याच्या वादावरून मुलाने केला वडिलांचा खुन धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव /प्रतिनिधी -रूपेश डोलारे : ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसप या गावांमध्ये रामपाल महाराजांची भक्ती न करण्याबाबत बोलण्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, पळसप येथे दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री १०:४५ वाजता वैभव चंद्रकांत लाकाळ याने आपल्या वडिलांवर, चंद्रकांत मदन लाकाळ (वय ६५) यांच्यावर खोऱ्याच्या दांड्याने हल्ला करून त्यांचा खून केला. रामपाल महाराज यांची भक्ती न करण्याबाबत बोलण्याच्या किरकोळ कारणावरून हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत यांचा मृत्यू झाला. मृताच्या मुलाने, प्रमोद चंद्रकांत लाकाळ (वय २९) यांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी भा.दं.वि. १०३(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments