भूमिहीनांना घरकुलासाठी जागा खरेदी अनुदान दुप्पट राज्य सरकारचा एक लाखापर्यंत रक्कम देणार -Gharkul Yojna

Hot Posts

6/recent/ticker-posts

भूमिहीनांना घरकुलासाठी जागा खरेदी अनुदान दुप्पट राज्य सरकारचा एक लाखापर्यंत रक्कम देणार -Gharkul Yojna

भूमिहीनांना घरकुलासाठी जागा खरेदी अनुदान दुप्पट राज्य सरकारचा एक लाखापर्यंत रक्कम देणार 


 मुंबई / प्रतिनिधी रुपेश डोलारे : भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना जागे अभावी घरकुलाचा लाभ नाकारला जाणार नाही यासाठी राज्य सरकारने पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत मोठा बदल केला आहे .या योजनेत भूमिहीनांना मिळणारे जागा खरेदी अनुदान आता 50 हजाराहून दुप्पट वाढवून एक लाख रुपये पर्यंत करण्यात आली आहे या संदर्भात माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जाग्या अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नयेत याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे हा निधी केवळ भूमिहीन पात्र लाभार्थ्यांसाठी वापरण्यात येईल शिवाय या अनुदानातून लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये देण्याचे प्रयोजन आहे. त्यांनी निवडलेल्या जागेची किंमत व हस्तांतरणाची शहानिशा तालुकास्तरीय समितीकडून केली जाईल यासाठी बाजार भाव गावठाणातील जमिनीचे दर अलीकडील खरेदी विक्री व्यवहार स्थानिक चौकशी आदींचा विचार विनिमय करूनच निर्णय घेतला जाणार आहे तसेच जागा खरेदी करताना लाभार्थ्याला विक्रेत्याबरोबर करार करावा लागणार आहेत त्यानंतर सरकारकडून मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यास देण्यात येईल.

गृह संकुल उभारण्याचा पर्याय

जागेची कमतरता असेल किंवा किमती वाढल्या असतील तर एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन गृह संकुल उभारू शकतात त्यासाठी तळमजला ते एक आणि तळमजला ते चार मजली इमारती उभारता येतील परंतु प्रति लाभार्थ्याला जास्तीत जास्त एक लाख रुपये किंवा प्रत्यक्ष किंमत यापैकी जे कमी असेल तेवढेच अर्थसहाय्य मिळणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे.

समूह विकासालाही चालना

किमान 20 पेक्षा अधिक लाभार्थी एकत्र येऊन हाउसिंग कॉलनी उभारत असल्यास जोड रस्ता पिण्याची पाणी ,ड्रेनेज वीज, आदी मूलभूत नागरिक सुविधांसाठी अतिरिक्त 20 टक्के अनुदान मिळणार आहे.हा खर्चही याच योजनेसाठी राखून ठेवलेल्या निधीतून भागवला जाईल सरकारच्या या निर्णयामुळे भूमिहीनांना मात्र स्वतःची घरकुल मिळवणे सोपे होणार असून ग्रामीण भागात समूह विकासाला चालना मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments