चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या जालना जिल्ह्यातील घटना-
जालना /प्रतिनिधी रूपेश डोलारे : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक(Paradh budruk) येथे शनिवार दि, 23 रोजी पहाटे एक हृदय द्रावक घटना उघडकीस आली कौटुंबिक वादातून व चरित्र्याच्या संशयावरून समाधान अल्हाट वय (30) याने पत्नी कीर्ती अल्हाट वय (25) हिच्या डोक्यात धारदार पहार घालून हत्या केली त्यानंतर स्वतः गळफास(Suicide) घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की समाधान व कीर्ती यांच्या विवाह पाच वर्षापूर्वी झाला होता. या दांपत्याला २ वर्षाची स्वामिनी नावाची मुलगी व ५ वर्षाचा रुद्र नावाचा मुलगा अशी दोन लहान अपत्ये आहेत ;काही दिवसांपासून या दांपत्यांमध्ये कौटुंबिक व चारित्र्याच्या संशयावरून वादातून भांडणे सुरू होते त्यामुळे कीर्ती काही दिवसापूर्वी माहेरी वसई तालुका सिल्लोड येथे गेली होती. समाधान अल्हाट यांनी तिला पाच-सहा दिवसापूर्वी जबरदस्तीने पारध येथे सासरी आणल्याचे नातेवाईकांनी सांगितले शनिवारी पती-पत्नी (Husband-Wife)दोघांमध्ये वाद झाला वाद वाढून विकोपाला गेल्याने रागाच्या भरात समाधान यांनी घरातील पहार डोक्यात घालून पत्नी कीर्तीचा खून(Murder) केला; त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे(Paradh Police Station) सहाय्यक निरीक्षक संतोष माने ,उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने कर्मचारी प्रकाश शंकर ,शिवाजी भगत ,होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला
भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन खटेकर यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या रात्री उशिरापर्यंत पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या दुर्दैवी घटनेमुळे निष्पाप दोन पालकांचे भवितव्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतदेह घरात पडलेले, मुलं खेळण्यात दंग, आई झोपलेली वाटली
सकाळी उठल्यानंतर मुलांना आई झोपली आहे असं वाटलं. त्यामुळे रूद्र आणि स्वामिनी ही मुलं घराबाहेर पडली आणि खेळू लागली. आजी (आईची आई) मीराबाई मोकसरे या घरी आल्या, त्यांनी मुलांना आई कुठे आहे, असं विचारलं. मुलांनी आई झोपल्याचं सांगितलं. आजी घरात गेल्यानंतर ही घटना समोर आली.
आजीने घरात प्रवेश केला अन् मृतदेह दिसले
मयत कीर्ती यांची आई मीराबाई दिलीप मोकसरे या हेडंबा यात्रेसाठी काल (शनिवारी) दुपारी ३ वाजता पारध बुद्रुक गावात आल्या होत्या. मुलीच्या घरात जाताच मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि जावयाने गळफास घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

0 Comments