शेती विक्रीला विरोध केल्याने आईचा खून करून मुलाची आत्महत्या एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार लातूर जिल्ह्यातील घटना-
लातूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी आई शेत विकण्यास विरोध करीत असल्याने मुलाने वयोवृत्त आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान रेनापुर तालुक्यातील सांगवी येथे घडली आहे .या खुनात अनेकांचा सहभाग असल्याचा संशय मयत वयोवृद्ध महिलेच्या मुलीने व्यक्त केला आहे या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये मयत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐण रक्षाबंधन सणाच्या तोंडावर अशी धक्कादायक घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याप्रकरणी या खुनामध्ये सामील असणाऱ्या वर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी वयोवृद्ध महिलेच्या मुलींनी केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रेनापुर तालुक्यातील सांगवी येथील काकासाहेब वेणुनाथ जाधव वय (48) यांनी रेनापुर पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती; दरम्यान मयताची आईचाही मृतदेह गावातील शेतात रात्री नऊ वाजता आढळून आला सदर घटनेची माहिती मयताचा मेव्हणा विनायक कोंडीराम जगदाळे राहणार इटी तालुका रेणापूर यांनी दिल्या तक्रारी नुसार पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम काकासाहेब जाधव यांनी शुक्रवारी दिनांक 8 रोजी अशी फिर्याद दिली की वडिलांना माझ्या बहिणींच्या लग्नाचे कर्ज झाले होते ते कर्ज फेडण्यासाठी शेत विकू दे अशी मयत काकासाहेब जाधव यांनी त्यांच्या आईकडे वारंवार विनवणी केली परंतु ती विरोध करीत होती त्यामुळेच आईचा काटा काढावा या उद्देशाने समिंद्रबाई वेनुनाथ जाधव वय (80) हिला जबर मारहाण करून, तोंड दाबून जीवे मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने शेतातील उसाच्या फडात पुरुन टाकले त्यानंतर मयत काकासाहेब जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आई व मुलाच्या पार्थिवावर एकाच चितेवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
या खून कटामध्ये अनेक जण सामील
मयत समिंद्रबाई जाधव यांच्या चारही मुला मुलींची लग्न झाली आहेत यातील मुलीशी संपर्क साधला असता आमच्या आईच्या व भावाच्या नावे असलेली जमीन आम्हाला नको म्हणून काही वर्षांपूर्वी हक्क सोड पत्र करून दिले होते आईला आमच्या भावाची कुटुंब सतत मारहाण करीत होती चार महिन्यापासून गावातील कोणाच्याही संपर्कात येऊ देत नव्हते. आईचा खून करून एकटा माणूस खड्डा खोदून प्रेताची विल्हेवाट लावू शकतो का असा प्रश्न उपस्थित करून यात अनेकांचा समावेश व संगणमताने खून केल्याची मुलीची म्हणणे आहे. पोलिसांनी तपास करून योग्य न्याय द्यावा अशी संतप्त प्रतिक्रिया मयताच्या मुलीने दिली.
माय-लेकावर एकत्र झाले अंत्यसंस्कार
मुलगा काकासाहेब वेणुनाथ जाधव व आई समिंद्रबाई वेणुनाथ जाधव यांच्या मृतदेहाची रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दोन्हीही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले
0 Comments