धाराशिव: शिवा वीरशैव मोक्षधाम योजनेअंतर्गत स्मशानभूमीसाठी जागा मिळण्याची शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : भूकंपग्रस्त जेवळी ( उत्तर ) तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी असलेल्या जागेवर म्हाडा कडून होत असलेली वृक्ष लागवड थांबवून सदर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी देण्यात यावी या मागणीसाठी जेवळी येथीलच श्यामसुंदर उर्फ राजू शिवबसप्पा तोरकडे हे 1ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

सदर विषयी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फेही लिंगायत समाजास स्मशानभूमीसाठी जागा मिळावी म्हणून शिवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली आहे.

सदर पत्रावर शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राज्य चिटणीस सातलिंग स्वामी, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष सत्येश्वर ढोबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments