पेट्रोलिंगच्या पोलीस व्हॅन ला ट्रकची जोराची धडक एका पोलिस हवालदाराचा मृत्यू, अन्य कर्मचारी जखमी धाराशिव- बीड महामार्गावरील घटना-Police Accident yermala police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

पेट्रोलिंगच्या पोलीस व्हॅन ला ट्रकची जोराची धडक एका पोलिस हवालदाराचा मृत्यू, अन्य कर्मचारी जखमी धाराशिव- बीड महामार्गावरील घटना-Police Accident yermala police Station


धाराशिव/प्रतिनिधी -रूपेश डोलारे:  पेट्रोलिंग दरम्यान पोलीस व्हॅन महामार्गाच्या कडेला उभे करून पोलीस कर्मचारी कारची तपासणी करत असताना भरधाव ट्रकने पोलीस व्हॅनसह कारला जोराचे धडक दिली या अपघातात कर्तव्यावरील एका पोलिस हवालदार गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून एका फौजदारासह एक पोलीस कर्मचारी व कार मधील पाच प्रवासी अशी एकूण सात जण जखमी झाली आहेत. अपघात गुरुवारी दिनांक 7 रोजी पहाटे दोन अडीच वाजेच्या सुमारास धाराशिवते बीड महामार्गावर चोराखळी तालुका कळंब गावाजवळ घडला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार श्रीराम बापु  कांबळे वय (57) वर्षे (पोलीस मुख्यालय धाराशिव) हे सहकारी कर्मचारी विशाल गायकवाड व 40 वर्षे पोलीस हवालदार (नेमणूक पोलीस ठाणे येरमाळा) पोलीस उपनिरीक्षक दिनकर जाधवर नेमणूक (मोटार परिवहन विभाग धाराशिव) हे पोलीस व्हॅन  क्रमांक Mh- 25 ए एल 08 56 मधून धाराशिव ते येरमाळा या महामार्गावर बुधवारी रात्री उशिरा पासून पेट्रोलिंग करत होते ते चोराखळी गावाजवळ पोहोचले असता गुरुवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास त्यांना एरटिगा कार क्रमांक Mh- 14 kg 34 78 बाबत संशय वाटल्याने ते पोलीस व्हॅन महामार्गाच्या कडेला उभी करून सदरील कारमधील प्रवाशांची विचारपूस करत होते याच वेळी भरधाव  वेगातील ट्रक क्रमांक एच आर 38 येईल 72 39 च्या चालकांनी पोलीस व्हॅनसह कारला जोराची धडक देत न थांबता फरार झाला. या अपघातात पोलीस हवालदार श्रीराम कांबळे हे उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाले तर पोलीस कर्मचारी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक जाधवर तसेच कार मधील प्रवासी आकाश मगरे, (राहणार लालवन तालुका फुलंब्री )लखन मधुकर सूर्यवंशी ,संतोष पुंडलिक सूर्यवंशी ,कृष्णा ईश्वर सूर्यवंशी ,अमोल शत्रुघन सूर्यवंशी (राहणार गोरपिंपरी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर )हे जखमी झाले या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281 ,106(1),125(ए),125(बी), तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments