महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना-
अहिल्यानगर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : श्रीगोंदा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळण्याची पुन्हा एकदा समोर आली आहे तालुक्यातील सुरडी गावच्या महिला सरपंच मीनाक्षी सकट याच्यावर दोघांनी जीवघेणा हल्ला करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला रविवारी दि,१७ रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरांना जवळील वडाळी रस्त्यावर ही धक्कादाय घटना घडली आहे. या हल्ल्यात सरपंच सकट यांची दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने त्या प्रसंगावधान राखून बचावल्या मात्र त्यांना मारहाण करण्यात आल्याने त्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत सरपंच मीनाक्षी सकट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काही दिवसांपूर्वीच आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता;हाच राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याचे आरोप त्यांनी केला आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपी विरोधात कोणतीही कारवाई केली नाही असा गंभीर आरोपीही त्यांनी केला आहे. या घटनेच्या वेळी सरपंच सगट याच्यासोबत त्यांचा लहान मुलगाही होता त्यांच्या पॅन्टवरील पेट्रोल पडले होते रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्या दुचाकी वरून जात असताना दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश टाकला त्यात थांबल्यानंतर आरोपींनीही त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले प्रसंगावधान राखल्याने त्या बालंमबाल बचावल्या आणि काही सुजाण नागरिकांनी त्यांना मदत केली पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले एका महिला सरपंच अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, पोलिसाचा धाक संपल्याचे चित्र
श्रीगोंदा तालुक्यात(Shrigonda Taluka) सध्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत असून गुंडगिरी करणारे लोकांची दहशत वाढल्यामुळे खाकी वर्दीचा धाक संपल्याचे चित्र दिसत आहे एका महिला सरपंचाला अशाप्रकारे पेट्रोल टाकून जीवनाचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments