धाराशिव: श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न-
धाराशिव प्रतिनिधी : श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज, धाराशिव येथे विज्ञान शाखेच्या वतीने एमएचटी - सीईटी, नीट व जेईई च्या पूर्व तयारीसाठी 'फिजिक्स्वाला' व 'फेनॉमेनॉल' च्या माध्यमातून विशेष वर्ग चालवले जातात. मागील अनेक वर्षापासून 'फेनॉमेनॉल' बॅचच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत. याच 'फेनॉमेनाल' बॅचच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दहावी बोर्ड परीक्षेत ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून इयत्ता अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा व पालक प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्री. ए. व्ही. भगत यांनी केले. त्यांनी 'फिजिक्स्वाला' व 'फेनॉमेनॉल' या दोन्ही बॅच विषयी सविस्तर माहिती दिली. 'फेनॉमेनॉल' बॅचच्या माध्यमातून जेईई, सीईटी ची तयारी उत्तम प्रकारे करून घेतली जाते. तसेच दर २० दिवसाला विद्यार्थ्यांची सीईटी सराव परीक्षा घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, नियोजन करावे असेही ते म्हणाले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी आपले पाल्य याच कॉलेजमधून शिकून सीईटी मध्ये ९९.८६% गुण घेतल्याचे सांगून कॉलेजमधील या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे यांनी मागील शैक्षणिक वर्षात एमएचटी - सीईटी परीक्षेत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमएचटी - सीईटी मध्ये चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पीसीएम गटातील विद्यार्थी कुमारी कुलकर्णी विनीता दत्तात्रय (९८.८६), बुर्ले अजिंक्य बिभीषण (९९.२७), माळी सोनिया महेश (९६.६५), दहातोंडे पियुष बालाजी (९४.०९), कासेगावकर शौर्य धनंजय (९४.०९) तसेच पीसीबी गटातून वरपे कृष्णा आप्पासाहेब (९८.२५) कुमारी बोलिम हसीना हाजी (९८.२५), कुमारी चव्हाण अस्मिता रमेश ९८.२५), कुमारी शेख मिसबा दाऊद (९७.७१), तांबोळी अमन जावेद (९७.०३) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच सध्या चालू असलेल्या इयत्ता बारावी 'फेनॉमेनॉल' बॅचची अलीकडेच पाचवी सीईटी सराव परीक्षा झाली. यामधील पीसीबी गटातून कुमारी मेंढे श्रावणी दत्तात्रय (१०२) कुमारी रेवळे समीक्षा अण्णा (९८) कुमारी कराळे समृद्धी पवन (९७) तर पीसीएम गटातून कुमारी जानवी राघवेंद्र (१२२) कुमारी माने भार्गवी श्रीकांत (११९) कुमारी शेख मिसबा समीर (१०६) यादेखील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यापैकी काहींनी आपले मनोगत व्यक्त करत आपला अनुभव सांगितला. तसेच चालू बॅचमधील विद्यार्थी कुमारी जस्मिन् जाकिर मुलानी, कुमारी मिसबा समीर शेख, कुमारी भार्गवी श्रीकांत माने, कुमारी जान्हवी राघवेंद्र कोकीळ यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी कॉलेजचे उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे तसेच फेनॉमेनॉल बॅचला अध्यापन करणारे श्री. जे. एस. पाटील, प्रा. श्री. एल. व्ही. पवार, श्री. एस. एल. तेली, श्री. एस. पी. शेटे, श्री. एस. एस. सदाफुले, सौ. मेटे पी. बी. सौ. बंडगर सौ. एस. बी. साळुंके, श्री. व्ही. एन. होळकर, श्री. व्ही. बी. स्वामी, श्री. एस. डी. जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. पी. ए. गर्जे तर आभार श्री. एम. व्ही. शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख आदींचे सहकार्य लाभले.
0 Comments