राज्यातील ११८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ, शिस्तभंगाच्या कारवाईस वसुली होणार-
मुंबई /प्रतिनिधी रूपेश डोलारे– राज्यभरात लाडक्या बहिणींची योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने सुरू केली त्याचा लाभ सर्वसामान्य महिला व उत्पन्नाच्या नक्षत असणाऱ्या महिलांनाच मिळणे अपेक्षित असताना या योजनेचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांनी अपात्र असून देखील लाटला असल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असल्याने त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाच्या वतीने ही यादी पाठवण्यात आली आहे त्या यादीच्या अनुषंगाने त्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संबंधित कर्मचारी कोण आहेत व कुठे कार्यरत आहेत याची माहिती घेतली जात आहे . संबंधित लाडक्या बहिणीची रक्कम वसूल तर होणारच मात्र नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून चौकशी केले जाणार आहे.महिला व बाल विकास विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या डेटावर आधारित तपासणी केली असता हा गैरप्रकार समोर आला. शासनाने दिलेल्या अपात्रतेच्या अटी स्पष्ट असूनही त्याकडे दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद महिला कर्मचारीवर कारवाई सुरू सीईओना ग्रामविकासचे कारवाईच पत्र-
लातूर जिल्हा परिषद नोकरीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या निदर्शनास आल्यावरून ग्रामविकास विभागाला कळवले सोमवार दि, 18 रोजी ग्रामविकास विभागातील लातूर जिल्हा परिषदेच्या सीईओने पत्र पाठवून लाभार्थी महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे
या पत्राने जिल्हा परिषदेतील लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे .ग्रामविकास विभागाने सीओना पत्र पाठवून कारवाई करण्यास सांगितली असली तरी त्यासोबत यादी जोडण्याची पत्रात म्हटले आहे परंतु यादीत आलेली नाही यादीच न आल्याने लातूर जिल्हा परिषदेसमोर कारवाई कोणावर करायचे असा पेच निर्माण झाला आहे. लाडक्या बहिण योजनेचा अपात्रतेचा अटीनुसार जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची गंभीर बाब समोर आली आहे पात्रता असताना लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर ची कारवाई होण्याची शक्यता आहे यादी प्राप्त झाल्यानंतर किती महिला कर्मचाऱ्यावर कारवाई होणार हे स्पष्ट होणार आहे लातूर जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग यादीचा शोध घेत आहे.

0 Comments