तुळजाई मंडळातर्फे जिजामाता प्रशालेस साऊंड सिस्टीम भेट-
![]() |
| तुळजाई मंडळातर्फे जिजामाता प्रशालेस साऊंड भेट देताना उपस्थित मंडळाचे पदाधिकारी प्रशालेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. |
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे : तुळजापूर (खुर्द) येथील तुळजाई सांस्कृतिक व क्रिडा मंडळाला मिळालेल्या विविध पुरस्काराच्या बक्षीस रकमेतून जिजामाता कन्या माध्यमिक शाळेस शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासून साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. या मंडळाचा उपयोग हेतू असा आहे की वर्गणीमुक्त गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळाने विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन ही भेट देण्यात आली.
या प्रसंगी तुळजाई गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब भोजने, उपाध्यक्ष श्री. सूरज जगदाळे, कोशाध्यक्ष श्री. धीरज देशमाने, सहकोषाध्यक्ष श्रावण डोके, सचिव विकास भोजने सहसचिव श्री. विवेक माहुले,ॲड श्री. प्रतीक जगदाळे,श्री. बाळू शेरेकर, श्री. दीपक माळी,ज्ञानेश्वर साबळे , जेष्ठ सभासद अमीर शेख तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती मेटकरी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी श्री. तूप्पे सर, कुंभार सर, साळुंके सर, दासकर सर, कोकरे सर, दराडे मॅडम, काठेवाड मॅडम, जेटे मॅडम, कांबळे मॅडम उपस्थित होते या सर्वानी या उपक्रमाचे कौतुक केले.


0 Comments