नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी, तब्बल ४० ते ५० म्हशी वाहून मृत्युमुखी -Nanded Rain live Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी, तब्बल ४० ते ५० म्हशी वाहून मृत्युमुखी -Nanded Rain live Update

नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी, तब्बल ४० ते ५० म्हशी वाहून मृत्युमुखी 


नांदेड/प्रतिनिधी रूपेश डोलारे:   गेल्या काही तासांपासून राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नांदेडमधील अनेक गावांना पुरानं वेढा घातला आहे. रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस बरसला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सहा गावं पाण्याखाली गेले आहेत. यापैकी २ गावातील ८० नागरिक अडकले आहेत. तर, ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाला आहे.नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि गाडी पाण्याखाली गेले आहेत. दोरीच्या सहाय्याने गाड्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे यामुळे शेती पिकांचे तसेच जनावरांचे तर काही ठिकाणी मनुष्यहानी झाल्याचे समजते आहे.

पुरामध्ये गोठ्यातील ४० ते ५० म्हशींचा मृत्यू

मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांना पुराचा वेढा बसला आहे. जोरदार पावसामुळे अनेक जनावर दगावली, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाला आहे. रावणगाव येथे एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.उद्गीर, मुखेड तालुक्यांत रविवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. अलीकडेच लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पूरपरिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावे पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलेमात्र, रावणगाव येथील गावठाणात 80 जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे 9 जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले होते.

Post a Comment

0 Comments