पी एम किसान निधीचा हप्ता उद्या मिळणार,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे होणार वितरण
मुंबई/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान )योजनेचा पुढील हप्ता उद्या म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभसू निश्चित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली .पीएम किसान निधी वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाराणसी येथे होणार आहे.
किसान विज्ञान केंद्रांना (केव्हीके )निर्देश देताना चौहान म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना 6 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो. या प्रक्रियेत केव्हीके महत्त्वाची भूमिका बजावतात कार्यक्रमाची आधीच तयारी करा अशी आव्हान करून थेट लाभ हस्तांतराची हमी देणारा तसेच जनजागृती मोहीम असलेला हा कार्यक्रम एखाद्या उत्सवासारखा व अभिनयासारखा साजरा केला जावा असे चौहान म्हणाले.शनिवार दिनांक 2 ऑगस्ट च्या या कार्यक्रमात सक्रिय तिने सहभागी होण्याची आव्हान केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांना केले योजनेचा लाभ घेण्याची आणि शेतकरी विकास योजनेची माहिती जाणून घेण्याची देखील ही संधी आहे असे त्यांनी सांगितले.
0 Comments