संत तुकाराम संस्था व संभव प्रतिष्ठानच्या वतीने इटकळ येथे पुरस्कार वितरण सोहळा, रक्षाबंधन व साहित्य सूर्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
----------------------------------------
धाराशिव प्रतिनिधी /रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था व केशेगाव येथील संभव प्रतिष्ठानच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध सामाजिक कार्य,कला,पत्रकारीता, शैक्षणिक, पोलीस प्रशासन, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा स्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला,तर रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांना महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते रक्षाबंधन व साहित्य सूर्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा, लोहारा तालुक्याचे आमदार प्रविणजी स्वामी,अणदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र आलुरे, जवाहर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संगमेश्वर जळकोटे , इटकळचे सरपंच सायबा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात नगीनाताई कांबळे, बजरंग ताटे, ईश्वर क्षीरसागर, शिवाजी गायकवाड, अशोक जाधव, विकास कसबे,जोशीलाताई लोमटे,किसन देडे,मिनाक्षीताई पेठे,रुपेश डोलारे, राजीव कसबे, पांडुरंग घोडके,भारत गायकवाड,अरुण लोखंडे,एस के गायकवाड, दादासाहेब बनसोडे,सुनिताताई भोसले, किशोर जाधव, लक्ष्मण क्षीरसागर, चंद्रकांत कांबळे, बालाजी गायकवाड, ॲड विलास साबळे, यांना पुरस्कार देऊन सन्मान सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार प्रविणजी स्वामी, बालाघाट महाविद्यालयाचे संचालक रामचंद्र आलुरे, ईश्वर क्षीरसागर,मिनाक्षी पेठे यांनी मार्गदर्शन केले
पुरस्कारार्थींच्या सन्मानपत्राचे वाचन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रबोध कांबळे केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी केले, सुत्रसंचलन डॉ संतोष पवार यांनी केले, तर आभार तुकाराम क्षीरसागर यांनी मानले.यासाठी मारुती बनसोडे,केशव गायकवाड, नामदेव गायकवाड,कपील क्षीरसागर, माणिक निर्मळे,प्रशांत क्षीरसागर, संतोष व्हटकर, डॉ प्रसन्न कंदले,किरण कांबळे गुरुनाथ गवळी,उदय क्षीरसागर, ओंकार गवळी यांच्यासह संत तुकाराम सामाजिक संस्था,संभव प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता.
0 Comments