तुळजापूर - लातूर मार्गावरील बायपास चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील दोन युवक ठार -Tuljapur Latur Road Accident

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर - लातूर मार्गावरील बायपास चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील दोन युवक ठार -Tuljapur Latur Road Accident

तुळजापूर - लातूर मार्गावरील बायपास चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत  कारमधील दोन युवक ठार -


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : तुळजापूर - लातूर मार्गावरून तुळजापूरकडे निघालेल्या कारला अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्या सुमारास घडला आहे गणेश पाटील व भरत मुळे असे अपघातातील मयतांची नावे असून हे दोघे लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत .

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर तुळजापूर रोड वरून तुळजापूरकडे निघालेल्या एका कारचा दिनांक 12 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर जवळील बायपास चौकात अपघात झाला या घटनेत लातूर जिल्ह्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही युवक नात्याने आतेभाऊ असल्याची समजते. दरम्यान या अपघातानंतर कारमधील एक जण परिस्थिती पाहून पळून गेल्याची माहिती आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा (Nilanga taluka) तालुक्यातील तळीखेड येथील गणपती विष्णू पाटील वय (22) अविनाश दयानंद मुळे वय (22) राहणार (भेट मुक्काम तळीखेडा ))व अन्य एक जण असे तिघे मंगळवारी रात्री कार क्रमांक KA- 34 एन 49 07 या कारमधून तुळजापूर - लातूर (Tuljapur-Latur)मार्गावरून तुळजापूरकडे निघाले होते; दरम्यान त्यांची   कार तडवळ गावाजवळ  असलेल्या बायपास चौकात आले असता त्यास भीषण अपघात झाला या अपघातात गणपती पाटील व अविनाश मुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण अपघात झाल्यानंतर गाडी जागीच सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व तुळजापूर पोलीस ठाणे(Tuljapur Police Station)  तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरिक्षक कृष्णा चौधरी यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन मयतांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात(District Hospital)  दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेतील मयत अविनाश मुळे हा निलंगा येथे हेल्पर म्हणून काम करीत होता तर त्याच्या आई-वडिलांना दोन मुली आणि एक मुलगी होती दोन वर्षांपूर्वी अविनाश याच्या मोठ्या भावाचा पुणे येथे अपघातात मृत्यू झाला होता त्यामुळे अविनाश एकुलता एक मुलगा होता त्याचाही अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला  आहे तसेच दुसरा मयत गणपती पाटील यांच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण असा परिवार आहे तो फोटोग्राफी चा व्यवसाय करत होता. या घटनेमुळे मयतांच्या  शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुळजापुरातील समाजसेवक लोकसेवा फाउंडेशनचे पंकज शहाणे यांच्याकडून जनजागृती व अपघातग्रस्तांना मदत कार्य 

Post a Comment

0 Comments