लातुर : दिव्यांग जनशक्ती सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने माटेफळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
लातुर : दिव्यांग जनशक्ती सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य लातूर यांच्यावतीने दि,१५ रोजी माटेफळ भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी संघटनेचे संस्थापक अध्यक्षश्री भीमराव किसन यादव तसेच संघटनेचे सचिव श्री चंद्रकांत दशरथ हजारे व पत्रकार दगडोजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याळेस ग्रामपंचायतचे सरपंच विठ्ठल आबा खोशे , उपसरपंच संजय बब्रुवान शिंदे, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री श्रीकांत मुंडे , आणि पत्रकार दगडोजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच गावातील उपस्थित गावचे पोलीस पाटील दिलीप उत्तमराव पाटील भारतीय सैन्य दलात असलेले गोपाळ बालासाहेब झांबरे हे उपस्थित होते राजेभाऊ हजारे बंकट भोंडवे दिगंबर खोशे वाल्मीक पांढरे आमद शेख महादेव हजारे संदिपान खोसे ग्रामपंचायतचे सदस्य शुभम खोशे बालाजी गुटलकर, प्रभू भानुदास ओव्हाळ,,ग्रामपंचायतचे सेवक श्री परमेश्वर हजारे व बिबीशन पंडित पांढरे आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments